चंद्रपूर - गडचिरोली महामार्गांवर टोल सुरु - स्थानिक वाहनधारकांची वाढली डोकेदुखी
सावली - चंद्रपूर - गडचिरोली महामार्गांवर हिरापूर जवळील टोलनाक्यामुळे सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक सावली तालुक्यातील वाहनधारकांनाही टोल भरावा लागत असल्यामुळे आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
शासन रस्ते तयार करते व या बांधकामाचा खर्चही जनतेकडून वसुल करण्यासाठी टोल घेत असते. गडचिरोली - चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले. या रस्त्याची वसुली करण्यासाठी सावली तालुक्यातील हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून कारपासून तर जड वाहनापर्यंत वेगवेगळे दर ठरविण्यात आलेले आहे. परंतु सावली तालुक्यातील जनतेलाही हा टोल भरावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी अनेक कामांसाठी सतत जावे लागत असते त्यामुळे दररोज टोल भरणे हे फार अर्थिकदृष्ट्या फार खर्चाचे झाले आहे. कारला जाणे - येणेसाठी विना फास्टॅग 160 तर फास्टॅग असेल तर 80 रुपये भरावे लागत आहे. त्यामुळे सावली तालुक्यातील वाहनधारकांना टोल आकारला जाऊ नये ही मागणी जोर धरू लागत आहे व भविष्यात सावली तालुकावासीय जनता आंदोलनाची आक्रमक भूमीका घेण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!