महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे राजुरा येथे अन्नदान .

       

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे मंगळवार दि.०९ जानेवारी २०२४ ला नारायणदास मावाणी गो-शाळा व छात्रावास, चुनाळा ता.राजुरा येथे अन्नदान करण्यात आले.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
              गरजू मुलांना वाढत्या वयामध्ये सकस आहार मिळावा या व्यापक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला .
               न्यासाच्या वतीने श्री विनोद कोंगरे,सौ मीना कोंगरे,सौ उषा उरकुडे यांनी सहभाग घेतला.या उपक्रमासाठी छात्रावासा चे व्यवस्थापक श्री दिलीपजी म्हैसने आणि इतर कर्मचारी  यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
      या उपक्रमाचा लाभ २५ गरजूंनी घेतला.
   
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!