या हिंदी चित्रपटाचे कलावंत थियेटर बाहेर विकत आहेत सिनेमाच्या तिकीट #Bebas
विदर्भातील पहिले हिंदी Hindi Movie चित्रपट बेबस आजपासून विदर्भातील आठ थीयेटर मध्ये प्रदर्शित होत आहे. स्थानिक 150 कलावंतांना घेऊन मूल व परिसरातच चित्रित केलेल्या या चित्रपटाची चर्चाही आता रंगू लागले आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाची जाहिरात झाल्याने, चित्रपटात काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहे. सर्व कलावंतांनी हा चित्रपट आपलाच चित्रपट असल्याचे मानसिकता तयार करून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा यासाठी सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी माजविली आहे.
आज पासून प्रदर्शित होणाऱ्या बेबसची तिकीटे थियेटर बाहेर विकताना या चित्रपटातील कलावंत दिसत आहे.
एखाद्या चित्रपटाची तिकीट विक्री त्याच चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांनी करणे, एकदाचे भारतीय चित्रपट सृष्टीतील एकमेव घटना असावी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!