सावलीत महिला बचत गटाकडून फराळ विक्री केंद्र सुरु - उमेदचा उपक्रम

 सावलीत महिला बचत गटाकडून फराळ विक्री केंद्र सुरु - उमेदचा उपक्रम
सावली - ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम उमेदच्या माध्यमातून सुरु असून सावली तहसील कार्यालयासमोर दिवाळीनिमित्त फराळ विक्रीचे दुकाने सुरु झाली आहेत.
    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बचतीचे महत्व सांगण्यासोबतच व्यवसाय प्रशिक्षण दिल्या जाते. व्यवसाय उभारणीसाठी कर्ज ही उपलब्ध करून दिल्या जाते व उत्पादीत मालाचे विक्रीकरिता मदतही केल्या जाते. महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री व्हावी याकरिता सावली तहसील कार्यासमोर दिवाळी निमित्त फराळ विक्रीचे केंद्र उभारले आहेत.  चकल्या, करंजे, लाडू व शेतातील पीकवलेले धान्य या केंद्रात ठेवले असून या वस्तूंची फार मागणी आहे. तिरुपती महिला बचत गट चांदली बुज, सरस्वती महिला बचत गट बोथली, एकता महिला बचत गट खेडी, गुंजन महिला बचत गट उसेगाव, बिरसा मुंडा महिला बचत गट हिरापूर, दुर्गा महिला बचत गट चांदली बुज, लक्ष्मी महिला बचत गट कापसी या गटांचे विक्री केंद्र सुरु आहेत.  दिवाळी निमित्त केंद्रास भेट देऊन फराळाचे साहित्य खरेदी करण्याचे आवाहन बचत गटांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!