दैनिक युगधर्म चे वार्ताहार गळफास घेऊन आत्महत्या



बल्लारपूर येथील संध्या दैनिक युगधर्मा चे तत्कालीन  वार्ताहार व बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीज  ( बिल्ट ) ह्या कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत 56 वर्षीय सुधीर लोखंडे ह्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले व संध्या दैनिक युगधर्म चे वार्ताहार सुधीर भाऊराव लोखंडे वय 56 वर्ष यांनी आज 9 ऑगस्टला सायंकाळी 4:00 वाजताच्या दरम्यान आपले राहते घरी विद्यानगर वार्ड येथील घरी  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.


आत्महत्या चे नेमके कारण कळू शकले नसले तरी बिल्ट कंपनी व्यवस्थापन व ठेकेदारांचा त्रास मुळे पत्रकार सुधीर लोखंडे ह्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सर्वात्र चर्चा आहे.


आत्महत्या पूर्वी सुधीर लोखंडे ह्यांनी मृत्युपूर्व पत्र लिहून ठेवले असल्याचे बोलल्या जात असून त्यात दोन व्यक्ती आपले मानसिक शोषण करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्येचा पर्याय स्वीकारत असल्याचे ठेकेदारांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये नमूद केले असल्याचे कुजबूज ऐकायला मिळाले आहे.

ह्याबाबतीत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस विभागाने अधिकृतपणे कुठलीही माहिती दिली नाही. आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाले असता त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!