विहिरीत पडून वाघीनीचे मृत्यू मेंडकी परिक्षेत्रातील घटना.





तळोधी बा (यश कायरकर.)
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियत क्षेत्रात मेंडकी गावाच्या रामाजी ठाकरे यांचा यांचा गट क्रमांक ४५१ या शेतातील विहिरीत पडून वाघीनीचे मृत्यू.
सकाळी जंगल परिसरातील गस्त घालत असताना वनरक्षक लाडे यांना दुर्गंधी आली असताना त्यांनी परिसरातील शेतातील विहिरीत मृत अवस्थेत वाघ आढळून आला. मृत वाघीनीचे अंदाजे वय ४ ते ५ वर्षे आहे. ही वाघिन ३-४ दिवसापूर्वी विहिरीत पडलेली असावी असा अंदाज आहे.


यावेळी डॉ.लोंढे मैडम, पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही, डॉ.पराते पशुधन विकास अधिकारी ब्रह्मपुरी, डॉ. लाडे, पशुधन विकास अधिकारी अरेर नवरगाव यांनी मोक्का पंचनामा व शविच्छेदन करून नंतर जाळण्यात आले.
 यावेळेस उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक शेंदुरकर, सालकर सर वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदेवाही, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे इको अध्यक्ष , स्वाब संस्थेचे यश कायरकर, महेश बोरकर, व उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण कर्मचारी उपस्थिती होते. 


पंचनामा व शवदहन करन्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!