बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथील विद्यार्थिनी कु. सानवी समर्थ चे सुयश




प्रतिनिधी:- मूल 

26 वी राज्यस्तरीय थांग -ता मार्शल आर्ट (ढाल तलवार) ही स्पर्धा दि. 31/10/2022 ते 2/10/2022 कोल्हापूर येथे संपन्न झाली या. स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून 1000 विद्यार्थी विद्यार्थिनीने सहभाग नोंदविले. या स्पर्धेत मूल येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे वर्ग 1 ली मध्ये शिकत असलेली कू. सानवी सुमित समर्थ या स्पर्धकाने सहभाग घेवून वय 6 वर्ष वयोगटात  - 21 वजन गटात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे तथा मूल शहराचे नाव लौकिक करत राष्ट्रीय स्पर्धकरिता कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी निवड झाली. या करीता कू. सानवी,  प्रशिक्षक रंगनाथ पेडूकर सर  तसेच पालक यांचे अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!