येनुली (माल) - तळोधी (बा.) रस्त्यावर आली झाडी, मोठ्या दुर्घटनेची शक्यता.

येनुली (माल) - तळोधी (बा.) रस्त्यावर आली झाडी, मोठ्या दुर्घटनेची शक्यता.
तळोधी (बा.)
       नागभीड तालुक्यातील तळोधी ते येनोली माल हा डांबरी मार्ग रस्त्याच्या दुतर्फा झुडपांनी व्यापला आहे. त्यामुळे राहगीरांना वळनावर समोरील काहीच दिसत नाही. मोठे अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे. तसेच रस्त्याचा काम झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला साधा मुरुमही टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्ता झाडे, गवत व कचऱ्यांनी व्यापला आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. झुडपांमुळे वळण मार्गावर समोरचे काही दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    ज्ञसहा महिन्यांपूर्वी तळोधी - येनोली माल या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आजतागायत रस्त्याच्या दोन्हीं कडेला मुरूम भरण्यात आलेला नाही. आणि त्यामुळे तळोधी-येनोली माल रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी झुडुपे वाढली आहेत.
     ज्ञमार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झूडपे वाढली आहेत. शिवाय गवत व झाडेसुद्धा मोठी झालेली आहेत. या मार्गाने मार्गक्रमण करताना समोरून येणारे वाहन या झुडपांमुळे दिसत नाही. परिणामी अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
         "या झुडपांच्या रस्त्यावर एखादेवेळी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील झुडपे व अनावश्यक कचरा साफ करण्यात यावा व रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम पसरविण्यात यावा," अशी मागणी येनोली मालवासीयांनी केली आहे.
   ‌‌      "तळोधी येनोली माल हा रस्ता फार रुंद नाही. सहा महिन्यांपूर्वी येथे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सुलुपांवर मुरूम टाकलेला नाही. दुतर्फा झुडपांची मोठी वाढ झालेली आहे. त्यांना वेळीच तोडणे गरजेचे आहे. नाहीतर अनुचित घटना घडण्यास वेळ लागणार नाही. शिवाय परिसरात वाघ,बिबट,अस्वल, रानटी डुकरे यांची भीती आहे.व कोणतीही अनुचित घटना घडू शकते."
 अमोल व्ही. बावनकर, सरपंच गट ग्रामपंचायत, येनोली माल, ता. नागभीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!