दगडाने ठेचून इसमाचा खूनअज्ञात आरोपीचा शोध सुरू...



शेगाव.. (जगदीश पेंदाम)
शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे आज सकाळच्या सुमारास एक अज्ञान इसमाचा मृतदेह चारगाव ते वायगाव मार्गावरील एका झुडपाआड नागरिकांना दिसून आला...

नागरिकांनी याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बु. येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांना दिली असता लगेच पोलीस पथक घटनस्थळी दाखल होवून
मृत व्यक्तीची तपासणी करून पंचनामा करण्यास सुरुवात केली. तसेच याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा आयुष नोपानी यांना दिली असता सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास केला असता अज्ञात मृतक याची ओडख पटली असून सदाशिव महाडुकर रा.भेंडाळा अंदाजे वय 55 वर्ष आहे, मृतक सदाशिव हा वायगाव भो.येथे एका संबंधित नातलगाच्या घरी गेला होता माझी कोर्टाची तारीख आहे असे सांगून तो घरा बाहेर निघाला असल्याचे घरातील लोकांनी सांगितले..
दरम्यान दि. 10 नोव्हेंबर च्या रात्री या मृतक इसमावर अज्ञान व्यक्तीने हल्ला करून दगडाने ठेचून जागीच ठार केले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असुन मृतक सदाशिवला दारूचे व्यसन असल्याचे बोलल्या जात आहे व त्यांच्या जवळ पाचशे रुपयेचा बंडल असल्याचे अशी गावात चर्चा आहे तेव्हा पैशामुळेच याचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून मृतकाच्या डोक्यावर व मानेजवळ दगडाने घाव आढळून आले आहे..
विशेष म्हणजे हा खून की घातपात आहे याचा अधिक उलघडा करण्याठकरिता श्वान पथक चंद्रपूर चे पथक दाखल करण्यात आहे होते तेव्हा श्वान पथक यांनी घटना स्थळाची सखोल चौकशी केली परंतु आरोपीचा शोध लागला नव्हता.. आरोपीचा शोध मिळालेला नसल्याने याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली psi प्रवीण जाधव, महादेव सरोदे, विठ्ठल वैद्य , राकेश तुरानकर,मदन येरणे , पुरुषोत्तम दातारकर पोलीस शिपाई पुढील तपास करीत आहे.घटना माहिती होताच परिसरातील नागरीकांनी पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी केलेली होती...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!