वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ चा मृत्यू.
नागभिड (यश कायरकर )
नागभीड वनपरिक्षेत्र अंतर्गत, मिंडाळा बीट , मासली कक्ष क्र. 669 मध्ये आज दुपारी पन्होळी येथील सत्यवान पंढरी मेश्राम वय 65 वर्ष, याचा शेळ्या चरत असताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत हा गावालगतच्या जंगलात शेळी चरण्यासाठी गेला असताना दुपारी एक वाजता चे सुमारास वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. दुपारी तो घरी न परतल्याने काही अनुचित प्रकार घडल्याच्या संशयावरून शोधाशोध केली असता संबंधित मृतक दुपारी अडीच वाजता च्या सुमारास जवळच्या झुडपी जंगलात मृतावस्थेत दिसले. घटनास्थळी पाहणी केली असता वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
वनविभागाच्या वतीने नागभीढ चे वनपरिक्षेत्र अधिकारी व गावचे सरपंच यांच्या उपस्थितीत मृताच्या कुटुंबाला वन व वनविभागाच्या वतीने २५०००/- (पंचवीस हजार) रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली.
परिसरात वाघाचा वावर असल्याने वन विभागामार्फत नेहमी खबरदारीची सूचना देण्यात येत असते. मात्र सुचलांचे पालन न केल्यामुळे अशा घटना घडणे स्वाभाविकच आहे. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून पीआरटी सदस्य, स्थानिक लोकांनासह वन कर्मचारी परिसरात गस्त करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!