मनसेतर्फे नगरपरिषद पवनी ला,ताला ठोको आंदोलन संपन्न
समस्या मार्गी लावण्याचे दिले मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहर पवनी तर्फे नगर परिषद पवनीला ताला ठोको आंदोलन दिनांक.१८/१०/२०२२ रोज मंगळवार ला मनसे शहर संघटक संजय पुरी वैकुंठे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते.पवनी नगरपालिका क्षेत्रातील नागरी समस्यांसाठी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी सतत निवेदन देऊन सुद्धा यात सुधारणा न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका व शहर पवनीतर्फे आंदोलनाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून म.गांधी चौकापासून आंदोलन सुरू झाले.
आंदोलनाच्या मुख्य मागण्या मध्ये घरकुल आवास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सुरळीत हप्ते देऊन तसेच अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल देण्यात यावे व गैरसोय टाळावे, शहरात तातडीने मुबलक शुद्ध पाणी पुरवठा करणे, शहरातील सिमेंट रस्त्याचे नूतनीकरण करणे, वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे, शहरातील बगीचांचे व मैदानाचे तात्काळ दुरुस्ती करणे व देखभाल करणे, शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, बाजारात आरो शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवून तहान भागविणे, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावणे, सदोष विकास काम करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर गुन्हा नोंद करून योग्य कार्यवाही करने व अनेक समस्यांसाठी मनसेचे शहर संघटक संजयपुरी वैकुंठे यांच्या नेतृत्वात तसेच तालुका अध्यक्ष भोजराज कांबळी, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल वाघमारे, तालुका संघटक सागर टावरी, तालुका उपाध्यक्ष दत्तू बारसागडे, तालुका उपाध्यक्ष सोनू उर्फ प्रमोद काटेखाये, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल उपरीकर, तालुका सचिव आकाश सेलोकर, शहर अध्यक्ष चेतन अवसरे, शहर उपाध्यक्ष राकेश आकरे, महिपाल राऊत, आकाश नंदुरकर, रजत उरकुडकर, निलेश कुरझेकर, धनराज उपरीकर, महेश बोरकर, शुभम बावणे, सोनू उके, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रमोद सेलोकर, सुरेश सेलोकर, मिथुन सेलोकर, अतुल भोयर, अक्षय ठवकर, अजय शेंडे, वैभव शेंडे, अमित मेश्राम, भुनेश्वर मेश्राम, राहुल मेश्राम, अतुल भूरे, मनोज मानापूरे, रोहित शेंडे, गोलू वाकेकर, प्रदीप वैद्य, राजेश कांबळी, राहुल फुंडे व समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!