गांधी पुतळा समोरील दारूच्या जाहिरातीचे फलक हटविले
मूल येथील गांधी पुतळ्यासमोर लावलेले दारूच्या जाहिरातीचे फलक अखेर नगर परिषदेने आज हटविले असून, या कारवाईबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
"गांधी पुतळ्यासमोर दारूच्या जाहिरातीचे फलक" या मथळ्याखाली पब्लिक पंचनामा ने बातमी प्रकाशित केली होती. आज नगर प्रशासनाने या बातमीची दखल घेत ही कारवाई केली आहे.
मूल शहरातील गांधी चौकात सेवन हिल बार, देशी दारू दुकानाचे जाहिरातीचे फलक नगर परिषदेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून लावले होते. उल्लेखनीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य शासनाचे नियमाप्रमाणे दारूच्या दुकानाची जाहिरात करता येत नाही. असे असतानाही दुकान आत मध्ये असताना, बोर्ड मात्र थेट गांधीजींच्या पुतळ्यासमोर लावून दारूच्या दुकानाची जाहिरात केली जात होती. ही बाब पब्लिक पंचनामा ने प्रकाशित करताच, मूलचे संवेदनशील तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी, बातमीची दखल घेत, मुख्याधिकारी यांना याबाबत पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला व तसे पब्लिक पंचनामाला सूचित केले. नगरपरिषद प्रशासनाने ही दोन दिवसात हा बोर्ड हटेल अशी माहिती पब्लिक पंचनामाला दिली. प्रशासनाने आज कारवाई करत गांधी पुतळ्यासमोरील दारूच्या जाहिरातीचे फलक हटविल्याने, अनेकानी तहसीलदार होळी, मुख्याधिकारी मनीषा वजाडे यांचे आभार मानले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!