चिमुर शहरातील मुख्य मार्गावरील रोड दुभाजकाच्या मधोमध लागवड केलेल्या झाडाची स्वच्छता करून सुरक्षित करण्यात यावे
तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाची मांगणी
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांचे अध्यक्षतेखाली नगर परिषद चिमुर येथे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नगर परिषदेचे अधिक्षक प्रदीप रनकांब यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप तळवेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव गौतम पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे , माजी नगरसेवक नितिन कटारे, व आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!