घोडाझरी अभयारण्यात आपसी झुंजीत वाघाचे मृत्यू

घोडाझरी अभयारण्यात आपसी झुंजीत वाघाचे मृत्यू

तळोधी बा (यश कायरकर) :
 
  घोडाझरी अभयारण्यात आपसी झुंजीत वाघाचे मृत्यू

 यश कायरकर:
 
  ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत, नागभिड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोडाझरी अभयारण्यात आज सकाळी एक वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळला.
वाघाच्या शरिरावरील जख्मा पाहता दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचे मृत्यू झाले असावे असे प्राथमिक अंदाज आहे. मृत वाघ हा याच परिसरात वावरनारा (T-11) हा वाघ 13 वर्षे वयाचा पुर्ण विकसित नर वाघ असल्याचे कळले आहे.


        घोडाझरी अभयारण्यातील बप्पर क्षेत्रात, हुमा बिटात,582 कक्ष क्र. मध्ये ही घटना काल रात्री घडली असल्याचे निदर्शनास आले आहे. वाघाचे मृत्यू 12 तास पुर्वी झाले असल्याची संभावना आहे.संबंधित मृत वाघाचे शवविच्छेदन हे घटनास्थळी करन्यात आले, व घटनास्थळी जाळण्यात आले.
 यावेळी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. गिरीश गभने नागभीड, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके ब्रम्हपुरी, बायलाजीस्ट राकेश आहुजा ब्रम्हपुरी,
वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड नागभीड, झेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे नागभीड, इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!