मोबाईलच्या युगात खेळू लागली मुले मैदानी खेळ
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र सध्या मुले मैदानी खेळ खेळतानी दिसत नाही मोबाईल गेमणे हा ट्रेंडचं बदलून टाकला आहे आता तर मोबाईलचे खेळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळ खेळले जात होते .मात्र सावरी बिडकर या गावातले युवक खेळू लागले मैदानी खेळ
पूर्वी शाळेला सुट्टी असली की मुले दिवसभर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळायचे.यात कबड्डी,गिली दांडू ,गोट्या लगोरी , क्रिकेट संकल आदी खेळाचा समावेश असायचा मात्र आता तासंतास मुले एकाच जागेवर बसून मोबाईलवर अनेक खेळांमध्ये हाणमारीचे प्रसंग राहत असल्यामुळे त्यांच्या मनावर आघात होऊ लागले होते . दिवसभर मोबाईल वर खेळत असल्याने त्यांच्या डोळ्यांवर प्रभाव पडतो मानेच्या नसा अडकतात अशा प्रकारे विविध परिणाम शरीरावर विविध भागावर पडत आहे.सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे मोबाईल वर गेम खेळण्याचे प्रमाण खुब वाढले होते.मात्र आता पुन्हा ग्रामीण भागात युवक मैदानी खेळ खेळताना मोठ्या प्रमाणात दिसु लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!