पवनी येथे दसरा उत्सव हजारोंच्या लोकसंख्येत मोठ्या उत्साहात संपन्न
आखाड्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली नृत्य व कलाकृती
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.१५/१०/२०२१ दसरा हा हिंदू धर्मियांचा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते.
विजयादशमी / दसरा विषयी काही प्रचलित कथा १) विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणी वधही. पण याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत.२) श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे .३) याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते.म्हणूनच संपूर्ण भारतात दसरा उत्सव साजरा करण्यात येत असतो.त्यातच भंडारा जिल्ह्यातील पवनी मध्ये प्रत्येक वॉर्ड मधून आखाडे निघत असतात या आखाड्यात वादयाच्या तालावर तसेच संगीताच्या तालावर विविध प्रकारच्या कलाकृती सादर केल्या जातात. हे बघण्यासाठी मोठं - मोठ्या शहरातील जनता धाव घेत असते. तर याची सांगता चंडकाई देवस्थान च्या समोरील आवारात रावनाला जाळून केल्या गेली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!