सांगली आटपाडी तालुक्यातील भारत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश

जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभूते )

कोल्हापूर : - सांगली आटपाडी तालुक्यातील भारत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारत पाटील यांच्याशी माझे गेली अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्व. रामभाऊ पाटील यांच्या अकाली जाण्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली. 

आज आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बदलत आहे. माजी आमदार सदाशिव पाटील व अन्य नेत्यांच्या प्रवेशाने तालुक्यातील ताकद संघटीतपणे वाढविण्यासाठी संधी मिळाली आहे.

येणार्‍या काळात आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल असा मला विश्वास आहे. संघटीत होऊन लोकांची मन जिंकून माणसे जोडली पाहिजेत. लोकशाहीत लोकप्रतिनिधींच्या मागे असलेली लोकांची ताकद महत्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,  पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, आनंदराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, राजू जानकर, भरत देशमुख, सुशांत देवकर, सूरज पाटील, नारायण खर्जे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!