नागभीड येथे पोलिसांचा निघाला रूट मार्च
उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उपस्थिती
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - आगामी काळात येणाऱ्या पोळा,तान्हा पोळा,गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत शहराच्या मुख्य मार्गाने तसेच मिश्र वस्तीतून व संवेदनशील भागातून आज रूट मार्च काढण्यात आला.यावेळी मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी,प्रमोद मडामे पोलीस निरीक्षक नागभीड पोलीस स्टेशन, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काढण्यात आला.
यावेळी सणासुदीच्या काळात योग्य तो बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने सज्ज राहावे अश्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिल्या.
सदर रूट मार्च नागभीड पोलीस स्टेशन चे चार पोलीस अधिकारी व वीस पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.. अचानक शहरात निघालेल्या या रूट मार्च मुळे नागरिकांमध्ये कुठे मोठी घटना घडली की काय असा अंदाज निर्माण झाला होता पण काही वेळात हा पोलीस विभागाचा रूट मार्च आहे असे लक्षात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!