५ सप्टेंबर शिक्षकदिना निमित्त सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लोकराज्य विद्या फौंडेशन , इस्लामपुर यांच्या वतीने सुधीर बंडगर यांचा सत्कार

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : - कोरोना संकटकाळात डोंगरी , दुर्गम ,जंगल भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात रहावेत यासाठी  नवोपक्रम राबविल्या बददल राज्य शासनाने राज्यात टॉप टेन शिक्षकामध्ये सुधीर बंडगर डोंगरी ग्रंथालय , चांदोली यांची निवड करुन सन्मानित केले.तसेच डोंगरी भागात क्रीडा , शिक्षण प्रसार व प्रचार व सामाजिक कार्यातील अतूलनीय योगदाना बददल फौंडेशनच्या वतीने ॲड. युवानेते राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे ( संचालक - सांगली जिल्हा मध्य सहकारी बॅक, माजी नगराध्यक्ष , इस्लामपुर ) यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. फौंडेशनचे संस्थापक , स्वच्छतादुत चंद्रशेखर तांदळे यांचा सत्कार करून सुधीर बंडगर
यांना प्रोत्साहित केले त्या बददल त्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!