चिमूर क्रांती प्रेस क्लब ची स्थापना
महीला पत्रकारांसह पन्नास पत्रकांरांचा "जम्बो" संघटन
चिमूर तालूक्यातील प्रिन्ट व डिजीटल मिडीया एकाच बॅनर खाली
चिमूर क्रांति प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी विनोद शर्मा तर सचिव जावेद पठान
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातिल गोर गरीब अन्यायग्रस्त जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्येशाने चिमूर तालूक्यातील प्रिन्ट मिडीया व डिजीटल मिडीया च्या पत्रकारांनी एकत्र येवून " चिमूर क्रांती प्रेस क्लब " चि स्थापना केली.विशेष बाब म्हणजे चिमूर तालूक्यातील महिला पत्रकारांसह प्रिन्ट व डिजीटल मिडीयाचे जवळपास पन्नास पत्रकार एकाच बॅनरखाली एकत्र आले असून जिल्ह्यातिल एकमेव "जम्बो" संघटना म्हणून चिमूरात निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.दिनांक. १ सप्टेंबर बुधवार ला चिमूर येथील शासकीय विश्राम गृहात जेष्ट पत्रकार रामदास हेमके यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ट पत्रकार पंकज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात तालूक्यातील प्रिन्ट व डीजीटल मिडीया च्या पत्रकारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये चिमूर क्रांती प्रेस क्लब ची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष पदावर चिमूर चे लोकमत समाचार प्रतिनिधी विनोद शर्मा यांची नियुक्ती तर सचीव पदावर डिजीटल मिडीया चे जावेद पठान यांची एकमताने निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदावर CTV चे चिमर प्रतिनिधी श्रीहरी सातपुते तर उपाध्यक्ष पदावर प्रिन्ट मिडीया चे भिसी चे राजेन्द्र जाधव( सकाळ ), शंकरपुर चे युवराज मुरस्कर (सकाळ),नेरी चे योगेश सहारे( पुन्यनगरी ) तसेच डिजीटल मिडीया ची महीला पत्रकार समीधा भैसारे नेरी यांची नियुक्ती करण्यात आली. सहसचीव पदावर खडसंगी चे प्रमोद राऊत ( पुन्यनगरी ),नेरी चे संजय नागदेवते ( महासागर) व डिजीटल मिडीया चे विलास मोहीनकर, चिमूर यांची निवड करण्यात आली. तसेच आशीष गजभिये खडसंगी,शुभम बारसगड़े नेरी,सुनील कोसे नेरी,पंकज रणदिवे नेरी,प्रवीण वाघे चिमूर,रोशन जुमडे, चिमूर,सुनील हिगनकर चिमूर,गणेश येरमे कोलारा, जगदीश पेंदाम शंकरपुर, विलास कोराम , मगेश शेंडे यांना सदस्य पदावर घेण्यात आले. तसेच जेष्ठ पत्रकार लोकमत चे चिमूर प्रतिनिधी रामदास हेमके व भिसी येथील नवभारत चे पत्रकार पंकज मिश्रा हे संघटनेचे मार्गदर्शक राहतील.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!