माजी विद्यार्थी ओमेश जांभुळे व त्यांच्या टीम ने स्वतःच्या वाढदिवसप्रसंगी चंदनखेडा शाळेला दिली कृतज्ञता भेट

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - जि. प. उ. प्रा. शाळा. चंदनखेडा येथे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी  "ओमेश जांभुळे ,"स. शि. तथा सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिमूर,  यांनी त्यांचे वाढदिवस प्रसंगी आपल्या आठ- दहा मित्रांसमवेत शाळेला
 "कृतज्ञता व सदिच्छा भेट" दिली.शाळेत आमच्या मु.अ.सौ.साधना धाईत , गायकवाड,कुंभारे ,कु.धकाते या शिक्षक बांधवांनी सरांचे व सोबत सर्व टीमचे यथोचीत स्वागत करुन वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम घेतला.यावेळी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच नयनजी जांभुळे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या उपस्थित मान्यवरासह सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
      सदर कर्यक्रमात ओमेश जांभुळे माजी विद्यार्थी यांनी शाळेविषयीच्या आठवणी ताज्या केल्या.सोबत किशोर पिसे माजी ग.शि.अ.तथा विद्यमान शि.वि.अ.चिमूर यासोबत रवि रासेकर ,मधुकर तुराणकर , योगिराज सहारे सर,प्रविण सातपूते ,रोहित केंद्रे ,पांडूरंग भोरे उपस्थित होते.
      यावेळी ओमेश जांभुळे यांनी शाळेला फिरत्या बागेसाठी "२० रोपासह २० कुंड्या"भेट म्हणून दिल्या.शाळेच्या वतीने कु.धकाते  यांनी कार्यक्रमाचे संचलन केले व त्यांनी शेवटी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.उपस्थीत टीम ने शाळे विषयी माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले व निरोप घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!