खडकी (पा.) येथे फाशी घेऊन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

खडकी (पा.) येथे फाशी घेऊन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या.

नागभीड : 
तालुक्यातील खडकी (पान्होळी) येथील शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतात फाशी लाऊन आत्महत्या केली. ही घटना आज दिनांक ७/९/२०२१ रोजी सकाळी सुमारे ६.०० वाजताची आहे. विनोद गंभीर मेश्राम (वय ५२ वर्ष) रा. खडकी असे मृतकाचे नाव आहे. मृतक आज सकाळी सुमारे ५.३० ते ६.०० वाजता दरम्यान शेतात गेले होते. सकाळी ९ वाजता धान निदनासाठी मजूर शेतात गेले असता त्यांना विनोद गंभीर मेश्राम हे शेतातील कडू लिंबाच्या झाडावर लटकून दिसले. या घटनेची त्यांनी लागलीच माहिती इतरांना दिली. पोलिस स्टेशन नागभिड ला माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्राथमिक तपास घेतला. त्यानंतर मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालय नागभिड  येथे शव विश्चेदनासाठी पाठविण्यात आहे. मृतक पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. नुकतेच मुलीचे लग्न झाले होते. मृतकांचे नावे बँकेचे व सोसायटीचे कर्ज असल्याने कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मात्र यासंदर्भात आधिक तपास केल्यानंतरच मृत्यूचे नेमके/गूढ उलगडले जाईल. या प्रकरणाचा सविस्तर तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक विनोद कोरवते, मेघश्याम गायकवाड यांचे वतीने सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!