अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या
अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या
शिवणी घाटावर आढळला मृतदेह
ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील अल्पवयीन युवक व युवतीचे प्रेत गडचिरोली जिल्हातील आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दि ७ ऑगस्टला आठळून सायंकाळच्या दरम्यान आढळून आले . स्वाती दिलीप मेश्राम वय १५ वर्ष व आशिष प्रभू मेश्राम वय १७ वर्ष दोघेही रा.चिंचोली बुजुर्ग त.ब्रम्हपुरी येथील आहेत. दोघांनीही एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली . सदर आत्महत्या हि प्रेम प्रकरणातून केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
स्वाती व दिलीप हे दोघेही ३ ऑगस्ट पासून बेपत्ता होते . दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्ह्पुरी पोलिस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दोघांचीही शोध मोहीम ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविली होती. दरम्यान आज दि ७ ऑगस्टला स्वाती व आशिष चा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर एकमेकाच्या हाताला दोर बांधलेल्या अवस्थेत आठळून आला . पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोह्वा अरुण पिसे करीत आहेत.
9 ऑगस्ट ला तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव
तालुका कृषी विभागाचे आयोजन
ब्रम्हपुरी प्रतिनिधी :- ब्रम्हपुरी तालुका कृषी विभागाच्या वतीने उद्या दि. 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे ओचीत्य साधून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती सभागृह ब्रम्हपुरी येथे करण्यात आले आहे .रानातील व शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानमेव्याला मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिक पावसाळ्यात उगवणाऱ्या रानमेवा जंगलातून गोळा करून बाजारात विकण्यासाठी आणून आपली उपजीविका करीत असतात . रानमेवा मानवासाठी आहारातील आरोग्यवर्धक असल्याने त्यास विशेष महत्व आहे. तालुक्यातील जनतेला रानमेव्याचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक फायद्याच्या दृष्टीने सदर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रिता उराडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर ,उपसभापती सुनिता ठवकर , जिल्हा परिषद सदस्य क्रिष्णा सहारे, डॉ.राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर,दिपाली मेश्राम ,स्मिता पारधी, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसिलदार विजय पवार, गटविकास अधिकारी डॉ.शिरीष रामटेके, रमेश जाधव उपविभागीय कृषी अधिकारी नागभीड उपस्थितीत राहणार आहेत.नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तालुका कृषी अधिकारी खंडाळे यांनी केले आहे.
गळफास लावून इसमाची आत्महत्या
सोन्द्री येथील घटना
ब्रम्हपुरी तालुक्यातील सोन्द्री येथील इसमाने घरी कुणीच नसल्याचे पाहून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दि.7 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.


Very good news
उत्तर द्याहटवा