कवठेमंकाळ तालुक्यातील टेंभू सिंचन योजनेचे पाणी पूजन संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभुते )
कोल्हापूर : - सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील टेंभू सिंचन योजनेअंतर्गत केरेवाडी, ढालगाव, लंगरपेठ यांसह १३ गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याचा जलपूजन सोहळा आज संपन्न झाला.
टेंभू योजनेतून आपल्या कवठेमहांकाळ तालुक्यास पाणी मिळावे यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. दुष्काळग्रस्त या भागाला पाणी मिळत नसल्याने बरीच वर्षे आंदोलन सुरू होते. गेले अनेक वर्षे एखाद्या चातकाप्रमाणे लोकं पाण्याची वाट पाहत होते. आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
स्व. राजारामबापू पाटील यांनी या भागाला पाणी मिळावे हे स्वप्न पाहिले होते. म्हणून त्यांनी सांगली ते उमदी पदयात्रा काढली होती. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा अनोखा प्रयोग केला होता.
युती सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोणताही प्लान, एस्टीमेट नसताना इथे नारळ फोडला. त्यावेळीही हा प्रश्न काही मार्गी लागला नव्हता.
२००४ च्या दरम्यान या भागात प्रचंड दुष्काळ होता. असा एकही भाग नव्हता जिथे पाणी सापडेल, हिरवळ सापडेल. मी तत्कालीन राज्यपालांना येथे भेट देण्याची विनंती केली. त्यांना भीषणता दाखवली, इथली परिस्थिती बघून त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळले.
आता २० वर्षांनंतर ही परिस्थिती बदलत असल्याचे पाहत असताना मला फार आनंद होत आहे. जशी या योजनेला गती मिळेल तसं लोकांच्या दारापर्यंत पाणी येईल. मात्र भविष्याचा विचार करत सर्वांनी नियमित पाणीपट्टी भरावी जेणेकरून ही योजना ठप्प होणार नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!