बेंबाळ येथिल ग्रामिण रूग्णालयाचे काम त्वरीत पुर्ण करा कॉग्रेसचे पवन निलमवार यांची मागणी

बेंबाळ येथिल ग्रामिण रूग्णालयाचे काम त्वरीत पुर्ण करा
कॉग्रेसचे पवन निलमवार यांची मागणी

मूल प्रतिनीधी

    ग्रामपचायत बेंबाळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या कित्येक दिवसापासून रुग्णालयाच्या नविन इमारतीचे बांधकाम हे संथ गतिने चालु असून याचा नाहक त्रास बेंबाळ आणि परीसरातील ग्रामिण जनतेला सहन करावा लागत आहे. तसेच कोरोनाच्या काळात चांगल्या डॉक्टरांचा अभाव व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथे येणाऱ्या रुग्णांची गैर सोय होत आहे. 
    रात्रीच्या वेळेस रूग्णांना भरती करायचे असल्यास दवाखाण्यात कुनीही हजर राहत नसुन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच बेंबाळ येथिल ग्रामिण रुग्णालयात १३ ते १४ गावे समाविष्ट असुन या सगळ्या गावातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्रामिण भागातील गरोदर मातांना जिव मुठीत घेऊन कोरोणाच्या काळात शहराच्या ठिकाणी जावे लागत असून हा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला निवेदन सादर करीत आहोत. तसेच या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आणि बांधकाम लवकरात लवकर करून चांगले डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. असे निवेदन युवक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन निलमवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,खासदार बाळु धानोरकर,चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना पाठविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!