जिल्हास्तरीय कुंग फु कराटे स्पध्ये मध्ये नेरीच्या विद्यार्थांचे सुयश

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुंग फु कराटे चॅम्पीयनशिप मध्ये नेरी येथील विद्यार्थांनी यश प्राप्त केले . ही चॅम्पीयनशिप मॉस्टर बी . राजेश्वर व मॉस्टर नरेन्द्र मेश्राम यांच्या स्मृती पित्यर्थ मास्टर  व्यकंन्ना पवार यांनी आयोजीत केली होती यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडुंनी भाग घेतला होता यामध्ये चिमुर तालुक्यातील नेरी येथील आदित्य फुलझेले व सागर खोब्रागडे यांनी रजत पदक प्राप्त केले तर मयुर कुंदोजवार , राहुल गहुकर व प्रणव आष्टनकर यांनी कास्य पदक प्राप्त केले यश प्राप्त केलेल्या विद्यार्थांचे मास्टर विनोद पुनेकर , नवनित मुन , शितल तेलंग , रवि दुधे , राकेश दिप , पिपलायन आष्टनकर , अरवींद पडवेकर , पिंटु मरसकोल्हे ,यांनी अभिनंदन केले.विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय शिफु सुशांत इन्दोरकर यांना दिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!