अर्जुनी कोकेवाडा येथे सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचा मृत्यू
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - दिनांक.०९/०२/२०२१ शेगाव येथून जवळच असलेल्या अर्जुनी कोकेवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत सुरू असुन आज सकाळ च्या सुमारास शेत शिवारात एक वाघ मृत्यूमुखी पडला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खडबड उडाली. तेव्हा या घटनेची अधिक माहिती मिळताच घटना स्थळी वनविभाग तसेच शेगाव येथील पोलीस कर्मचारी दाखल झाले तेव्हा या गंभीर घटनेची बाब लक्षात घेता याची सखोल चौकशी व पंचनामा वन विभागाचे कर्मचारी , पोलीस कर्मचारी करीत आहे. या दोन्ही वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्त लिहे पर्यंत पंचनमा सुरू होता . याचा अधिक तपास शेगाव येथील ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण जाधव तसेच पोलीस कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी करीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!