चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तहसील चा समावेश करू नये यासाठी सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या वतीने आक्षेप बैठक संपन्न
वैयक्तिक व संघटनेच्या वतीने जास्तीत जास्त आक्षेप अर्ज दाखल करण्याचे ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीचे आवाहन
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि त्यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व गावाचा समावेश करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि तसे पत्र सुधा मा. जिल्हाधिकारी यांनी दि.29 जानेवारी 2021 रोजी काढून या संदर्भात आक्षेप घ्यायचे असल्यास पत्र काढल्या पासून 15 दिवसाच्या आत जनतेनी आक्षेप नोंदवावे असे पेपर मधून जाहिराती द्वारे कळविले होते.याची तातडीने दखल घेऊन चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नये या मागणीसाठी दि.7 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता गंगाबाई तलमले कॉलेज येथे मा.प्रा.बजाज सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या आणि जनतेच्या वतीने महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर उपस्थित मा.प्रा. ड्रा.देविदास जगनाडे सर, चोले सर,बोराडे सर व ड्रा. प्रेमलाल् मेश्राम यांनी चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करण्यास स्पष्ट नकार देत ,या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे सोबतच याला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी वैयक्तिक व संघटनेच्या वतीने बारा तारखे पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी येथे आक्षेप अर्ज ईमेलद्वारे किंवा वैयक्तीक रित्या ऑफिस मधे नोंदविण्याचे आवाहन केले.तसेच आक्षेप अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे, आणि येत्या 11 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता गंगाबाई तलमले कॉलेज येथे परत विस्तारित बैठक घेऊन,चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नये आणि ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करण्यात यावा या मागणीसाठी तीव्र आक्रोश मोर्चा काढण्या साठी सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या तसेच जनतेच्या पुढाकारातून एकजुटीने निर्णय घेण्यात येणार आहे.
सदर बैठकीचे संचालन विनोद झोडगे तर प्रास्ताविक सुधीर भाऊ सेलोकर यांनी केले.या बैठकीत विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!