पी.आर.सी.मु.अ. सर्व व्यवस्थापन यांची सभा संपन्न

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - cwsn विद्यार्थी अंतर्गत सर्व शिक्षा अभियान या विषयावर राजीव गांधी कन्या विद्यालय शंकरपूर येथे विविध विषयावर सभा घेण्यात आली असून यामध्ये शालेय परिसराची स्वच्छता, शाळेतील विविध नोंदवही अभिलेखांचे अद्यावतीकरण, कैरोना काळात विद्यार्थी करीता केलेले शैक्षणिक कार्य, शालेय पोषण आहार योजना, व इतर सर्वसाधारण सूचना या विषयावर परिसरातील सर्व मुख्याध्यापक यांची सभा घेण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किशोर पिसे शंकरपूर, साठगाव बीट शिक्षणाधिकारी,अशोक गायकवाड केंद्रप्रमुख हिरापूर, दादाची परचाके केंद्रप्रमुख साठगाव सर्व शाळेचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!