सोमनाथ भाविकांचे श्रध्दास्थान
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मूल नगरीला आणि आजूबाजूच्या परिसराला निसर्गाचे भरभरून दान लाभलं आहे राजकीय सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुता इथे वास करत आहे मूल पासून सुरू झालेल्या टेकड्या पश्चिमेच्या दिशे पर्यंत विस्तारल्या आहेत पर्यटकांना आणि भाविकांना लांब वरूनच दर्शन देणाऱ्या या टेकड्या म्हणजे सोमनाथ च्या याच टेकड्यावंर याच काळ्या पाषाणावर स्थिर असलेले देवस्थान म्हणजे सोमनाथचे मंदिर येथील प्राचीन शिवलिंगामुळे या स्थळाचे सोमनाथ असे नामकरण झाले मूल पासून पश्चिमेस नऊ किमी अंतरावर हे देवस्थान वसलेले आहे शिवलिंगाच दर्शन आणि निसर्गाचा अनमोल ठेवा मनात साठवून भावीक धन्य होतात जाडजूड आकारांचे दगडांनी बांधलेले मंदिराच्या गाभा-यातील शिवलिंगाची मनोभावे भावे पूजा अर्चा केली जाते भाविकांचे श्रद्धास्थान आणि एक जागृत देवस्थान म्हणून येथे भक्तांची आणि पर्यटकांची असते दरवर्षी महाशिवरात्रीची चैत्र पौर्णिमा आणि श्रावणात येथे भक्तांची गर्दी राहते एक पर्यटन स्थळ म्हणून सोमनाथ केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मंदिरालगत असलेला आणि काळ्या पाषणातून सातत्याने धावणारा आणि निसर्गाचा अनमोल ठेवा असलेला धबधबा काळ्या पाषाणातील मोठमोठ्या गुफा दगडांच्या कमानी आणि येथील वनराई नेहमीच भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे पर्वत रांगाचे दरी खोऱ्यातून झरण आणि काळ्या पाषणांमधून खळखळत वाहणारा सोमनाथ चा धबधबा पर्यटकांच्या नेहमीच आपल्याकडे आकर्षित करीत असतं येथे येणारे भाविकांना या धबधब्यात स्नान विधी करण्याचे मोह आवरता आवरत नाही सोमनाथच्या वैभवशाली वनसंपदा येत पाऊल टाकले की या धबधब्याच्या आवाजाची जादू पर्यटकांच्या मनात आनंदाने भरते येते येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या थकवा दूर करण्याचा चमत्कार येथील परिसर करीत असतात कारण मंदिरातील घंटेचा नाद पक्ष्यांचे मधूर स्वर आणि पंचक्रोशीत दुमदुमणारा धबधब्याचा आवाज त्यांच्यात नवचैतन्य आणि सुजनशीलता निर्माण करीत असते पर्वत रंगाचे कुशीत आणि आमराई च्या छायेत परिसरात असे असल्याने येथे थंडावा आहे
सोमनाथ हे एक जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक आहे सोमनाथला धार्मिक स्थळाचा दर्जा मिळालेला आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मार्कंडा येथे जाणाऱ्या भाविकांचे पाय सोमनाथ कडे वळते शिवरात्रीची चैत्र पौर्णिमा आणि श्रावणात येथे दरवर्षी भाविकांची चांगलीच गर्दी असते देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पायथ्याशी असलेल्या गाय मुखातून वाहणाऱ्या पाण्याची चव घ्यावी आणि दृश्य ते पाहून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे अशी येथील प्रचिलित प्रथा आहे येथील पाण्याचे उभा कमानी अतिशय देखण्या आहेत श्रावणात येथील परिसर हिरवाईने रमणीय असतो शिवलिंगाचे दर्शन आणि वैभवशाली अनमोल ठेवा मनात साठवून भाविक संतुष्ट होतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!