भावना खोब्रागडे विश्वसमता प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित।
सिंदेवाही (प्रतिनीधी)
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्र्ट राज्य आयोजित विश्व समता कला मंच लोवले या संस्थेमार्फत 15 वा विश्वसमता पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 24/01/2021 रोजी रत्नागिरी येथे पार पडला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्र्ट राज्यातील एकूण 32 पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सहभाग होता. पैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील साहित्यिक/ कवयित्री भावना खोब्रागडे ह्यांना राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप "मानपत्र" , "आकर्षक स्मृतीचिन्ह" हे होते
विश्व समता कलामंच लोवले, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक मा. मनोज जाधव सर , सहकारी सुनिल सुरेखा सर, मा. सुरेश कुराडे सर, रिया पवार, निलम गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करन्यात आला या प्रसंगों भावना खोब्रागडे यानी विशेष आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!