पळसगाव ग्राम पंचायतवर दुसऱ्यांदा माहिलाराज
सरिता विकास गुरनुले यांची सरपंच पदी निवड
तुळशीदास भिवाजी शेरकुरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - दिनांक १०/२/२०२१ ला चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वाचे लक्ष लागून असलेल्या पळसगांव ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सरिता विकास गुरनुले यांची निवड करण्यात आली.या पूर्वी सुद्धा सदर ग्राम पंचायत वर महिलेचे राज होते परत एकदा ग्राम सदस्यांनी महिलेला संधी दिली आहे .या वेळी तरी पुरुष सदस्यला संधी मिळते की काय अशी गावातील नागरिकाची पुरुष सदस्यांची भूमिका होती मात्र सरपंच पद मला मिळावे या साठी पुरुष उमेदवारांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले. मात्र या वेळी ग्राम पंचायत वर नवयुवक महिला ३० वर्षच्या महिलेला संधी दिली आहे.तर उपसरपंच पदी तुळशीदास भिवाजी शेरकुरे यांची सुध्दा बिनविरोध निवड करण्यात आली.९ सदस्य संख्या असलेल्या पळसगांव ग्रामपंचायतीत एक महिला दोन प्रभागातून अविरोध निवडून आल्यामुळे एका प्रभागाचा राजीनामा सादर केल्या असल्यामुळे ८ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला बहुसंख्य सदस्य पुरोगामी विचारसरणीचे असून आगामी काळात ग्रामपंचायतीतील सर्वच पदाधिकारी ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकासात्मक कामे मार्गी लावतील असा विश्वास सामाजिकच्या त्यांनी व्यक्त केला आहे.निवडणूक अद्यासी अधिकारी म्हणून आनंदराव हजारे साहेब,उंदीरवाडे ग्रामसेवक,दडमल तलाठी ,ग्राम पंचायत कर्मचारी या निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्या मध्ये ,हाफिज शेख,सरिता गुरनुले, सरिता मेश्राम,संजय सोनेकर,मनीषा घरत,संगीता चौधरी,प्रभाकर गजभिये,तुळशीदास शेरकुरे,या निवडीमुळे गावातील,घनस्याम बन्सोड,बालाजी बन्सोड, सखाराम गुरनुले,वित्तल गुरनुले,विनायक ठाकरे,शंकर वाटगुरे,कार्यकर्ते यांनी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!