" कोणताही सुगावा नसतांना दुर्गापूर पोलीसांनी घेतला हरविलेल्या मुलीचा शोध "
चंद्रपूर : - पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सी. पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर यांनी दिनाक. 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी 1/30 वाजता चे दरम्याण घरी कुणालाही काहीही न सांगता घरून निघुन गेली तिचा शोध घेतला असता मिळुण आली नाही. अशा प्रकारची फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे ला. मिसींग क्र. 45/2020 अन्वये नोंद करण्यात आली.
पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत 'नांदेडकर , चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे दुर्गापुर यांनी विशेष पथक तयार करून सदर पथकातील पो.उप.नी. प्रविण सोनोने, पोहवा. सुनिल गौरकार पोहवा. अशोक मंजुळकर, नापोशी. उमेश वाघमारे, पो.शी. मनोहर जाधव. संतोष आडे, सुरज लाटकर, अखेर मुलीचे लोकेशन अजिंठा जिल्हा औरंगाबाद येथे असल्याची खबर मिळाल्याने दुर्गापूर पोलीसांनी तात्काळ अजिंठा गाठुन सदर हरविलेल्या मुलीस ताब्यात घेवुन तिला तिचे आई वडीलाच्या सुपूर्त केले. सदर मिसींग मधील हरवलेली मुलगी हि मागील दिड महिण्यापासुन मिसींग होती.व हरवलेली मुलगी सापडल्याने तिच्या आई वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!