शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण अथवा नवीन अर्ज
मूल :(प्रमोद मशाखेत्री)
सामाजिक न्याय विशेष सहाय विभागाकडून प्राप्त होणा—या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरण्याचे आदेश सहाययक आयुक्तांनी महाविद्यालयाला दिले आहेत. त्यामूळे सर्व शिष्यवृत्ती लाभासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावे लागणार आहे.
शैक्षणिक सत्र 2020—21 या वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण अथवा नवीन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पात्र विद्याथ्र्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता,शिक्षण फी,परीक्षा फी आणि इतर अनुज्ञेय शुल्क त्यांच्या आधारला जोडून असलेल्या बॅंक खात्यावर सरळ जमा होणार आहे. त्यात भारत सरकार शिष्यवृत्ती योजना,जीओआय, मॅट्रिकोत्तर शिष्यवुत्ती,राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती,गुणवत्ता शिष्यवुत्ती,वसतीगृहात राहणा—या विद्याथ्र्यांचा निर्वाह भत्ता इत्यादी प्रदान हेाणा—या शिष्यवृत्यांचा समावेश आहे.
नूतनीकरणासाठी लागणारे कागदपत्र :— 1) उत्पनाचा दाखलाा 2) मागील वर्षाची मार्कसिट
3)अॅडमिशन पावती 4)टिस्ी
नवीन अर्ज शिष्यवृत्ती साठी :— आधार कार्ड,जातीचा प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र
मार्कसिट,अॅडमिशन पावती,टिसी,
आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबधीत महाविद्यालयात /शाळेत नेवून दयावे.
विद्याथ्र्यानी युजर नेम व पासवर्ड स्वता जपून ठेवावे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!