मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चंद्रपूर दौरा आणि स्थानिक आमदारांना निमंत्रण सुद्धा नाही ?

आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचा आरोप

घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दि,08/01/2021 चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला आज भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थीत अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.

याप्रसंगी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचीव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री कपोले, अपर जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत  वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कार्यकारी अभियंता संदीप सातपुते, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अ.का देसाई,  घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पु. म. फाळके, अधीक्षक अभियंता काटपल्लीवार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यानी प्रकल्पाच्या कामाकडे  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष द्यावे आणि गरज पडल्यास निधीची मागणी करावी असे सांगितले.  प्रकल्पाची किंमत कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण होईल याची काळजी अधिकाऱयांनी घ्यावी, असेही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी  गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा यांनी मुख्यमंत्र्यांना घोडाझरी शाखा कालव्याविषयी माहिती दिली. घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या  उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके(ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली ) येतात. यातील 19 गावात 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे  9 हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ  होणार आहे.  उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची  आवश्यकता असून सदर निधी लवकर मिळाल्यास  डिसेंबर 2023 पर्यंत या शाखा कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध  होईल, अशी माहिती वेमुल कोंडा  यांनी दिली.

तत्पूर्वी ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर  तयार करण्यात आलेल्या  हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आगमन झाले. तिथे  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुध्दा प्रथमच गोसेखुर्द प्रकल्पाची अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

आणि कालव्याच्या कामामध्ये अगोदर झालेला भ्रष्टाचार हा जनते समोर आणण्यासाठी चा तर मंत्र्यांचा दौरा नसावा ? अशीही चर्चा सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.आणि अशातच चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भंगडीया यांनी ABP माझा या न्यूज चैनल च्या माध्यमातून जनतेला संदेश पटवून दिला कि पालकमंत्र्यांनी स्वतः प्रशासनाला माहिती दिली कि आमदारांना या मंत्र्यांच्या दौऱ्या विषयी ची माहिती पण देऊ नका आणि येऊ पण देऊ नका व बोलावू सुद्धा नका असे का करण्यात आले असावे ? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जर आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना बोलाविले असते तर ज्या कामावर ते येत आहेत त्या कामाबद्दल ची माहिती पुरविली असती कि गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे भू - संपादनाचे पैसे मिळालेले नाही.अनेक वर्षांपासून अनेक कामे तिथे बंद पडलेली आहे.अनेक गोष्टी होत्या लहान - लहान कामे लहान - लहान गोष्टी मुळे बंद पडली आहे.वर्षभरात आमदारांनी तक्रार करून सुद्धा 10 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणू शकतो अनेक विषय आज मुख्यमंत्री साहेबांच्या नजरेपुढे आणून देता आल्या असत्या आणि ते प्रश्न सुद्धा सुटले असते.मात्र जिल्हातील राजकारण हे विरोधाभासाचं राजकारण असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला विचारणा करून आपण सर समजू शकता आपल्याला का बरं बोलाविलेले नाही असे प्रशासनाकडून उत्तर आमदारांना दिले जाते.तर हे स्थानिक जिल्ह्याचं राजकारण त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.असेही देखील आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया ABP माझा या न्यूज चैनल च्या माध्यमातून जनतेला म्हणाले.यात काय सत्य समजावे आणि काय स्थानिक राजकारण याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खडबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!