घटनेतील दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार - खासदार प्रफुल पटेल
भंडारा ज़िल्हा सामान्य रुग्णालयाला दिली भेट
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - दिनांक. १०/०१/२०२१ जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारच्या पहाटे लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हि वेदनादायी व मन सुन्न करणारी घटना आहे. हि घटना ज्यांच्या दुर्लक्षीतपणा व निष्काळजीपणामुळे घडली. या बाबीची सखोल चौकशी केली जात असून यातील दोषीवर निश्चित कारवाई होणार तसेच या घटनेची पुनर्रावृती होऊ नये या बाबीची दखल राज्य सरकार घेणार याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशीचर्चा केली आहे . या घटनेला जबाबदार असणार्यांची कुठलीच गय केली जाणार नाही अशीही ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी घडलेल्या घटनेचा आढावा तसेच आपदग्रस्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खा. प्रफुल पटेल हे आज रविवारी (दि-१०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. रुग्णालयात रुग्ण सेवेच्या दृष्टीने रुग्णालयातील उणीवा, उपाययोजना आदी बाबी जाणून घेतले. या सर्व उणीवा त्वरीत दूर करण्यास सांगितले. रुग्णसेवेत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी यावेळी फटकारले. शनिवारी घडलेली घटना अंत्यत दुर्देवी असून या घटनेमुळे ज्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. आणि ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले ते कधीही भरुन न येणारे आहे. या घटनेतील मृतक बालकांना यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. तसेच अशा घटनांची पुनर्रावृती होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे , आमदार राजुभाऊ कारेमोरे , धनंजय दलाल , श्रीमती सरिता मदनकर , यशवंत सोनकुसरे, हेमंत महाकाळकर, राजू सलाम, रवींद्र वानखेडे, आरजू मेश्राम, श्रीमती मंजुषा बुराडे, उमेश ठाकरे, दुर्गा गभणे, प्रदीप सुखदेवे, दयानंद नखाते , गणेश चौधरी, गणेश बाणेवार,अरुण अंबादे, प्रभू फेंडर, रवी लक्षणे, ईश्वर कळंबे आदी पदाधिकारी तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, ज़िल्हाधिकारी संदीप कदम, ज़िल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, ज़िल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, ज़िल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!