देलनवाडी येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण




सुरेश कन्नमवार(सावली) 

आज दिनांक २९/१/२०२१ रोजी कृषी संजीवनी सेंद्रीय शेती उत्पादक गट मौजा देलनवाडी तालुका सिंदेवाही येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाला उपस्थित श्री खेडकर साहेब  तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही. डॉ.नागदेवते साहेब कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र शिंदेवाही, श्री महाले सर मंकृअ नवरगाव. श्री हातझाडे सर (ATM), श्री शिवानंद गाडेवर श्री विनोद मदनकर गोवर्धन गोशाळा ब्रह्मपुरी. श्री ए डी आरू कृस देलनवाडी, श्री. जीवनदास भरडे प्रगतशील शेतकरी सेंद्रिय शेती कलमगाव
सदर प्रशिक्षणात सेंद्रिय शेती महत्त्व, गरज ,फायदे ,जीवामृत बिजामृत दशपर्णी अर्क बनवण्याच्या पद्धती,सेंद्रिय प्रमाणीकरण पद्धत. इ. विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!