सोशल मीडियामुळे संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर..... शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक, व्हाट्सअप, टि्टर, इन्टाग्राम, शेअर, चा वापर.....
सोशल मीडियामुळे संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर.....
शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक, व्हाट्सअप, टि्टर, इन्टाग्राम, शेअर, चा वापर.....
शंकरपूर(जगदिश पेंदाम)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आजचा युवक, युवती, नागरिक सण-उत्सव,वाढदिवस, थोर पुरूषांच्या पुण्यतिथी, जयंती, अभिनंदन व आभार निमंत्रण, यांच्यासह लग्नपत्रिका, मरण पावलेल्या व्यक्तींची कार्यक्रमाची पत्रिका अशा विविध प्रकारच्या आमंत्रण पत्रिका व नववर्ष सहित शब्दांच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चा माध्यमातून देण्यात येत असून त्यामुळे प्रत्यक्षात भेटून कार्यक्रमाला बोलविण्याची आणि शुभेच्छा देण्याची परंपरा लोप पावत चाललेली आज दिसून येत आहे....
21 व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मोबाईल वरच सुंदर दिसणाऱ्या विविध प्रकारच्या इमेज तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सण-उत्सव, वाढदिवस, थोर महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, अभिनंदन विविध कार्यक्रम यांच्या शुभेच्छा करण्यात येत आहे आज सणासुदीला तर सकाळपासूनच किंवा आदल्या दिवसापासूनच अभिनंदन केले जात असते त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मधील फेसबुक व्हाट्सअप च्ये बॉक्स शुभेच्छामूळचे पूर्ण भरून जाते असतो..
आज मोबाईल ने आणलेल्या क्रांतीला चाळीस वर्ष पूर्ण झालेली असल्याने युवक, युवती कडून व्हाट्सअप च्या माध्यमातून विविध प्रकारच्या नवनवीन इमेजेस तयार करून एकमेकांना शुभेच्छा पाठवण्यात येते त्यामुळे प्रत्यक्षात भेटून अभिनंदन व शुभेच्छा देण्याची परंपरा संपत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे..
----–---------------------
व्यस्त जीवनात सोशल मीडियाला फार महत्त्व देण्यात आले असून तेवढाच घातकही ठरत आहे आज फक्त फायदा पाहण्यात येतो कुणीही नुकसान काय होत आहे याची परवा करत नसून यासाठी स्वतः निर्णय घेण्याची वेळ आली आहे...युवराज मुरस्कर शंकरपुर
सोशल मीडियाच्या युगात थोडीफार संस्कृती ग्रामीण भागात शिल्लक असल्याचे दिसून येत आहे मात्र शहरात लुप्त होण्यात जमा झाली आहे शहरात सण-उत्सव नावापूरते साजरे केले जातात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नातेसंबंध संपत जात आहे.... राजकुमार माथुरकर कवडसी देश
पंधरा-वीस वर्षांपूर्वी मित्र नातेवाईक कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा अभिनंदन भेटल्यावरच देत होते आता मात्र प्रत्यक्षात न भेटता सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो या प्रकारामुळे नातेसंबंध व आपुल की पणा कमी होत चालला आहे....राहुल मडावी चिमूर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!