तलावात बुडून बालकाचा मृत्यू

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - शंकरपुर येथून जवळ असलेल्या कवडशी 
( देश) येथील दहा वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज  दिनांक १३/१२/२०२० रविवार ला दुपारी २ वाजता घडली आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की कवडशी (देश )येतील करण नरेंद्र बगडे वय10वषे व त्याचे दोन मित्र हे गावाजवळ असलेल्या गाव तलावात सिंगाडे तोडण्यासाठी गेले होते नरेंद्र हा तलावातून शिंगाडे तोडत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडू लागला असता तसेच त्याचे दोन मित्र तिथून पळून गेले परंतु बाजूनीच एक महिला कपडे धूत असताना तिच्या लक्षात आले तिने गावात धाव घेवुन लोकाना बोलविले व त्या बालकाला बाहेर काढले त्याला शंकरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता तिथून चिमूर येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये नेत असताना वाटेतच त्या बालकाचा मृत्यू झाला असून जिल्हा परिषद शाळा कवडशी येथे चौथ्या वर्गात शिकत होता याच्या मागे एक लहान बहिण असून आई वडिलावर खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे भिसी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!