भीषण अपघात 4 जागीच ठार तर एक गँभिर जखमी

भीषण अपघात 4 जागीच ठार तर एक गँभिर जखमी

   मुल (कुमुदिनी भोयर)    
काल राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु झाला. अपघातात स्मीत पटेल (25), मोहम्मद अमन (23), दर्शना उधवाणी (25) आणि प्रगती निमगडे (24) यांचा जागीच मृत्यु झाला तर योग गोगरी हा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर मुलं हे मूल येथील प्रतिष्ठीत व्यापारी घरातील असून प्रगती निमगडे हिचे वडील शिक्षक आहेत. चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून येत होते हे पाचही जण स्वताच्या  MH 34 AM 9297 या गाडीने परत येत असताना शेतामधुन निघणाऱ्या ट्र्ँक्टरने धडक दिल्याने  चौघाचाही जागीच घात झाला.  चौघांच्याही आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या अपघाती मृत्युने चारही कुटूंबाना   कोसळलेला दुःखाचा डोंगर पेलण्याची शक्ती देवो. ही प्रभु चरणी प्रार्थना. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!