200 युनिट वीज बिल माफी व वाढीव विज दर मागे घेण्याबाबत विजय वडेट्टीवार यांना निवेदन
सिंदेवाही (प्रतिनीधी)
२००युनिट वीज बिल माफी ,वाढीव विज दर मागे घेणे व शिवसेनेच्या वचन नाम्या प्रमाणे 30%कमी करण्यासंदर्भात येत्या १४/१२/२०२० तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्या,या करीता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कोविड-19 महामारी दरम्यान जनतेची परिस्थिती बिकट होती आणि यामधून आज पर्यंत बाहेर पडले नाही असे असताना दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस पासून वीज दर वाढवून जास्तीचे विज देयके देण्यात आले ती रद्द करून 200 युनिट वीज बिल माफ करावे आणि शिवसेनेने दिलेले वचन पाडावे याकरता दिनांक 14/ 12 /2000 पासून होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे हित आणि महामारी ची परिस्थिती नजरेत घेऊन निर्णय घ्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टी सिंदेवाही यांनी केली.
१) कोविड19 दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे 200 युनिट विज बिल माफी करावी.
2) एम एस ई बी कडून दिनांक 1 एप्रिल 2020 पासून करण्यात आलेली वीज दर मागे घ्यावी.3)शिवसेनेच्या वचन नाम्याप्रमाणे 300 युनिटपर्यंत 30% टक्के स्वस्त वीज देण्याचे वचनपूर्ती करावे.
4)राज्य सरकारच्या 16% अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा.
5) वीज कंपन्यांचे C A G एडिट करण्यात यावे, हे वरील विषय अधिवेशनात मांडण्यात यावे याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले, यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ सदस्य श्री मनोहरजी पवार, आम आदमी पार्टी सिंदेवाही चे सचिव श्री सुरेश सोनवाने, हिरालालजी इंदुरकर, किशोरजी मेश्राम, विलास गंडाटे, श्रीमती मीनाक्षी मेश्राम व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!