पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे भव्य रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन १४८ पोलीस अधिकारी अंमलदार आणि नागरीकांनी घेतला सहभाग

पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे भव्य रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन
१४८ पोलीस अधिकारी अंमलदार आणि नागरीकांनी घेतला सहभाग

मुंबई येथील २६/११ या आतंकवादयांच्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या विरांना श्रध्दांजली म्हणुन दि. २८/११/२०२० रोजी या शहिद दिनाचे औचित्य साधुन पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात बल्लारशाह येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच स्थानिक नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. सदर शिबीरात एकुण १४८ पोलीस अधिकारी, अमंलदार आणि स्थानिक नागरीकांनी सहभाग घेतला असुन सदर शिबीरातील उपस्थितांना रक्तदान केल्याने काय फायदे आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान केल्यामुळे एखादया गरजु व्यक्तींना याचा लाभ होउ शकेल.




तसेच कोरोनाग्रस्त व्यक्तींना प्लाझ्मा दान करून त्यांचे प्राण सुध्दा कशा प्रकारे वाचविण्यात येवु शकते याबाबत सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आणि याचा फायदा गरजुंना नक्कीच होईल या उददेशातुन सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम/शिबीर पोलीस विभागातर्फे घेण्यात येईल तरी सर्व नागरीकांनी ब्लड आणि प्लाझ्मा दान करून एक सामाजीक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर/राजुरा, सुशिलकुमार नायक यांचे नेतृत्वात पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे सह पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील अधिनस्त अधिकारी आणि अंमलदार यांनी महत्वाची भुमिका बजाविली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!