ओबीसी विशाल मोर्चाला ओबीसी बांधवांचा उत्कृष्ट प्रतिसाद
चंद्रपुर :
मोहम्मद सुलेमान बेग
आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनी ओबीसींच्या संवैधानिक हक्कासाठी महामोरचे आयोजित करण्यात आला होता. या ओबीसी मोर्चा मध्ये चंद्रपूर महानगर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील समाज बांधवांच्या मोठ्या संख्येने सहभाग मिळाला . या विशाल मोर्चा मध्ये मोठया संख्येने बांधवांनी आपली हजेरी नोंदविली होती.
मोर्चाची सुरुवात चंद्रपूरच्या दीक्षाभूमी पासून सुरुवात करण्यात आली तर हा मोर्चा चंद्रपूर शहराच्या मुख्य मार्गाने निघून हा मोर्चा चांदा मैदान पर्यंत पोहोचला.
ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरला.
ओबीसी समूहाची नव्याने जनगणना करण्यात यावे.
* ओबीसीचे नोकऱ्या व त्यांचे शिक्षणाचे आरक्षण यासंदर्भातील अन्याय दूर करण्याची मागणी हजार ओबीसी बांधवांना या मोर्चाच्या माध्यमातून रेटून धरण्यात आला होता.
मोर्चाचा बंदोबस्तकरिता चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता व हा मोर्चा शांततेत पार पडला.
या मोर्चाच्या कुशल नेतृत्व म्हणून बळीराज थोटे, डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाशा गावतुरे, विजय बदखल,विजय मुसळे, सूर्यकांत खनके अशा अनेक सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!