इको प्रो संस्था चंद्रपुर तसेच वनविभाग मोहर्ली (बफर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2020 रोजी प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
इको प्रो संस्था चंद्रपुर तसेच वनविभाग मोहर्ली (बफर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2020 रोजी प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चंद्रपुर:-
प्रितम साखरकर (प्रतिनिधी)
यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर मधील पद्मापूर गेट ते मोहर्ली हा 16 किमी पर्यंत चा रोड आहे.आणि या रोड ने नेहमी पर्यटक, प्रवासी येणे जाणे करत असतात.वनविभागाने सूचना दिलेल्या असताना देखील नेहमी पर्यटक तसेच प्रवासी रोड च्या बाजूला प्लास्टिक, कचरा टाकत असतात.
हे प्लास्टिक कचरा जनावरांसाठी हानिकारक असल्यामुळे दिनांक 29/11/2020 रोजी प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून वनकर्मचारी तसेच इको प्रो संस्थेचे सदस्य व वनमजूर यांनी पद्मापूर गेट ते मोहर्ली पर्यंत रोड च्या बाजूला असलेल्या प्लास्टिक, कचरा गोळा करून रोड स्वच्छ करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोडच्या बाजूला प्लास्टिक किंवा इतर कचरा टाकू नये अशा सूचना देत जनजागृती करण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित आर.जी मुन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर), ए.डी मल्लेलवार क्षेत्र सहाय्यक मोहर्ली,गजपुरे क्षेत्र सहाय्यक आगरझरी, देऊळकर क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक जी डी केजकर मोहर्ली, भट,धनविजय,ताजने, गायकवाळ, पेद्दिवार, कोडापे, कातकर इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, इको प्रो संस्थेचे सदस्य तसेच वनमजूर देखील उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!