गळफास लावुन इसमाची आत्महत्या #sucide
गळफास लावुन इसमाची आत्महत्या
उसेगाव येथील घटना
शुभम बारसागडे :- नेरी (प्रतिनिधी)
नेरी वरून हाकेच्या अंतरावर असलेल्या उसेगांव येथे आज दि. 16 जून ला सकाळी ११ वाजता म्हसली शेतशीवारात झाडाला गळफास लावुन वीनायक चीरकुटा गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे.
ही घटना सकाळी शेतकऱ्यांना शेतावर गेल्यावर माहीत होताच त्यांच्या नातलंगाना सांगीतली. लगेच त्यांची बहीण व नातलग शेतावर गेले. ही माहीती पोलीस पाटील यांना कळवली व त्यांनी ही माहीती पोलीस वीभागाला कळवली. लगेच पी. एस. आय. रेजीवाड कॉमटा मँडम, पी. एस. आय. किरण मेश्राम, कैलास आलाम, रोशन तामशेटवार, हे घटना स्थळी पोहचले. पंचनामा करून उपजील्हा रूग्णालय चीमुर येथे शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
मृत विनायक चिरकुटा गायकवाड वय ५५ वर्षं रा. सोनेगाव (शेंडेगाव) ता चिमूर, ४ ते ५ वर्षापासून बहिणीकडे उसेगावला राहत होता. त्यांनी सिद्धार्थ राजेस्वर डांगे यांच्या शेतामध्ये म्हसली रोड वरील शेतात गळफास लाऊन आत्महत्या केली
या अगोदर सुध्दा एक दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. तो मानसीक ग्रस्त असल्याचे नातलगांकडून माहिती मिळाली. पुढील तपास नेरी पोलीस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!