लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करा
लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करा.
श्री गुरुदेव सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वणी (दिलीप भोयर)
कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावामुळे निर्माण झालेल्या विविधसमस्यांचे निराकरण तातळीने करण्यात यावे या करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री गुरुदेव सेने कडून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
चीन मधून निर्माण झालेल्या कोरोना विषाणुने जगात कहर माजविला आहे. याचाच दुषपरिणाम देशात व राज्यात होऊ नये म्हणून २५ मार्च पासून लॉक डाऊन चालू आहे मागील तीन महिन्यापासून सर्व शेतकरी,शेतमजूर, छोटे, मोठे व्यवसायिक, कामगार , मजुरदार घरीच असल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळल आहे. यातच शेतकऱ्यांचा खरीप हंगामही सुरू झाला आहे. तरी राज्याची विष्कळलेली घडी मात्र सुधारलेली नाही. यामुळे विविध समस्यांनिर्माण झल्या असून यात राज्यातील शेतकऱ्यांचा १५ हजार आर्थिक रुपये मदत देण्यात यावी, उन्हाळी फुल,फळे, व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांची झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्व वीज ग्राहकांचे मार्च ते आगष्ट २०२० पर्यन्त २०० ट्युनिट वीज चे बिल माफ करण्यात यावे, सर्व प्रकारच्या कर्जदारांचे बँक व खासगी संस्था वरील कर्जाचे व्याजमाफ करण्यात यावे व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी डिसेंम्बर २०२० पर्यंत हप्ते भरण्यासाठी सूट देण्यात यावी, लॉक डाऊनमुळे राज्यातील नाभिक समाजावर उपासमारीने वेळ आली असून त्यांचे सलून दुकान सार्वजनिक दुरावा ठेवून सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा सर्व नाभिक बांधवांना प्रति १० हजाराची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू झाला असून अद्याप पर्यंत लाखो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. त्यांना तातडीने पीक कर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात यावे, शेतकऱयांना बी- बियाणे व खते कृषी केंद्रातून मुबलक पध्द्तीने उपलब्ध करून देण्यात यावे, सर्व शासकीय कार्यालये चालू करावेत, शिक्षकांचे जाने येणे बंद करून त्यांना मुख्यालयी ठेवून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात जने करून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व गोरगरीब शेतमजूर,गवंडी कामगार, माथाडी कामगार, दुकान कामगार, कारखाने कामगार, रिक्षा चालक, आटो चालक, व इतर कामगारांना संजय गांधी निराधार योजनेचा एक वर्ष लाभ द्यावा. तालुका पातळीवर मोफत कोरोना तपासणी केंद्र उभारावे, ज्या भागात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे त्या जिल्ह्याची सीमा बंद करावी व ज्या भागात कोरोना नाही त्या भागातील जिल्हाबंदी उठविण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री याना पाठविण्यात आले यावेळी श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, मुख्यसंघटक मिलिंद पाटील, पुंडलिक मोहितकर, रामचंद्र वाभिटकर राहुल काटकर आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!