कायम विनाअनुदानित शाळांत बोगस विद्यार्थ्यांचा सुळसुळाट.

कायम विनाअनुदानित शाळांत बोगस विद्यार्थ्यांचा सुळसुळाट?

कोरोना संकटात डबघाईस आलेल्या शाळांनी घेतला फायदा.






मूल (प्रकाश चलाख)

तालुक्यातील काही कायम विनाअनुदानित शाळानी आपली पटसंख्या टिकविण्यासाठी व शाळा वाचविण्यासाठी संस्थापकाच्या मदतीने बोगस विद्यार्थी गोळा करून शाळेच्या हजेरीपटावर नोंद करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मू ल तालुक्यात शासकीय, निमशासकीय, तसेच कायम विनाअनुदान तत्त्वावर प्राथमिक, माध्यमिक शाळा असून या शाळांना निर्धारित पटसंख्या कायम ठेवताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असून शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी व शाळेची मान्यता कायम राहण्यासाठी संस्थापकाच्या मदतीने अनेक विद्यालयातील गुरुजी मुलांच्या शोधात को रो ना संकटात भटकत असून अनेक ठिकाणी विद्यार्थी, पालकांशी "आर्थिक व्यवहार" करून विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करीत असल्याचे तालुक्यातील परिस्थिती आहे.

को रोणा संकट मार्चमध्ये उद्भवल्याने शैक्षणिक सत्र संपण्याच्या अगोदरच शाळा बंद कराव्या लागल्या. नुकताच अनेक शाळांनी आपला निकाल जाहीर करून नवीन सत्रा साठी प्रवेश भरती सुरू के ली. परंतु संचारबंदी असताना अनेक शाळेतील कार्यरत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांपर्यंत पोहोचता आल नाही. याचाच फायदा घेत काही डबघाईस आलेल्या शाळा नी आपली पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना, पालकांना विविध प्रलोभने दाखवून विद्यार्थ्यांची टीसी हस्तगत करून
परस्पर प्रदेश देण्यात आले आहे त.

मुल तालुक्यात गेल्या काही वर्षापासून कायम विनअनुदानित शाळा कार्यरत असून या शाळांमध्ये अनेक बोगस विद्यार्थी बाहेरून पार्सल करून परीक्षेला प्रविष्ट केले जाते. अशा शाळांनी विद्यार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र जोडण्यात येऊन हजेरी पटावर त्याची नोंद केल्या जाते. प्रशासनाला तसा अहवाल पाठविला जातो. अशा बोगस विद्यार्थ्यांकडून संस्थापक, शिक्षक आर्थिक व्यवहार करून पास करून देण्याची हमी दिल्या जाते. या प्रक्रियेत अनेक कायम विनाअनुदानित शाळा दरवर्षी लाखोंची उलाढाल करीत असतात. शासनाकडून अशा शाळांची, संस्थांची योग्य ती चौकशी करून सदर शाळेची मान्यता काढून टाकण्यात यावी.

शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शहरी-ग्रामीण भागातील विद्यालयांना विद्यालयातील किमान पटसंख्या निर्धारित केलेली आहे. किमान पटसंख्या कायम असेल तरच विद्यालय सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अनेक विद्याल ये आपली शाळा वाचण्यासाठी बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाख वून शाळा चालवित आहेत. अशा शाळांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या पळवापळवी प्रक्रियेमुळे अनेक नामांकित शाळा ना आपली पटसंख्या कायम राखण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कायम विनाअनुदानित शाळा कार्यरत असून या शाळांमध्ये दरवर्षी अनेक बोगस विद्यार्थी हजेरीपटावर दाखवून संस्थापक शाळा चालू ठेवत असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो.

मुल तालुक्यात अशा काही बोगस शाळा कार्यरत असूनअशा शाळांची चौकशी शिक्षण विभागाकडून करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती पालकांनी शासनाकडे केली आहे.

"यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!