अवघ्या २४ तासात चोरी गेलेला सोना व रोख रक्कमेचा लावला शोध
५ लाख ४४ हजार रुपयांचा माल केला हस्तगत
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चिमूर पोलीस स्टेशन येथे दि. ३०/०५/२०२० रोजी फिर्यादी शंकर नथुजी बोबडे रा. बामणी ता.चिमूर यांचे घरी अज्ञात चोराने चोरी करून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली असल्याने पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्र. १९२/२०२० कलम ३८० भा.द.वि. चा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी आपल्या पूर्ण कसोशीने व गोपनीय माहितीने चोरी झालेल्या सोनाच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण ५,४४,५०० रु. चा मुद्देमाल अवघ्या २४ तासात हस्तगत केला असून स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे सोबत सदर तपास सहापोनी मंगेश मोहोड ,पो.ऊप.नी.अलीम शेख , पो.उप.नी. राजू गायकवाड , पोहवा विलास निमगडे , ना.पो.शी. किशोर बोढे , बलदेव कुंभरे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कुणाल राठोड, प्रमोद गुट्टे, सुशील आठवले यांनी पार पाडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!