गावरान आंब्याची वानवा

गावरान आंब्याची वानवा


जितेंद्र पेंदाम
आंबा म्हटला की उन्हाळ्यात आठवन येते त्या गावरान आंब्याच्या रसाची.आणि आंब्याच्या पन्न्याची.आंब्याचा पन्ना तर उन्हाळ्यातील थंड पेय म्हनुन| मोठया आवडीने लोक पितात.तसं उन्हाळ्यात जर उन्हाने शरीर तापलं लु लागली, तर आंब्याचा पन्ना हमखास पिल्या जाते.त्यामुळे उन्हाची दाहकता कमी होते.
आंब्याचा रस हा ग्रामिण भागात एकदाच मिळते.त्यामुळे गावरान आंंब्याला विशेष मागनी असते.
ग्रामिण भागातील आंबराई उन्हाळ्यात फुलून दिसते.
पाडाचा आंबा खायची वेगळीच मजा असते.पाडाचा आंबा चविला स्वादीष्ट व रूचकर असते. त्यामुळे अंबराई मध्ये ग्रामिण भागातील मुलं अंबराईमध्ये उन्हाळ्यात नेहमिच दिसतात.
परंतु यावर्षी आंबराई फुललीच नाही. आंब्याला मोहोर आला नाही. परीणामी झाडाला आंबे लागलीच नाही.त्यामुळे गावरान
आंब्याचा तुटवडा जानवत आहे.
यावर्षी गावरान आंबे रसाला मिळत नसल्याने ग्रामिण भागातील ग्रामिणांना आंब्याचा रसापासुन वंचित राहायची वेळ आलेली असल्याचे चित्र ग्रामिण भागात पाहायला मिळत आहे.
बाजारातील आंबा गरीबांना परवडनारे नाही. बाजारातील आंब्याची किमत पन्नास ते शंभर रूपये असल्याने ग्रामिणांना खरेदी करायला जड जात आहे.
गावरान आब्यापेक्षा बाजारातील आंब्याची चवही वेगळीच असल्याने ग्रामिण भागातील नागरीक आंबा घेत नाही.
परंतु यावर्षी गावरान आंबे न आल्याने गावरान आंब्याची वानवा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आंबेच न आल्याने आंबे पिकवनारे शेतकरी आर्थिक बाबीने हतबल झालेले दिसत आहेत.
ग्रामिण भागातील अनेक शेतकरी बांधावरचा ,शेतातला आंबा विकतात. परंतु यावर्षी आंब्याचा उत्पादनच न झाल्याने अनेक शेतकरी संकटात सापडला आहे.
एकीकडे आंबे विकुन व्यवसाय करनारे शेतकरी तर दुस-या बाजुने आंब्याचा रस पिनारे शौकीन असा दुहेरी लाभ देनारे आंब्याचे पिक . मात्र यावर्षी आंब्याने दोघानाही झुलवलं.
गावरान आंबेच नसल्याने रसाची वानवा झाल्याचे चित्र ग्रामिण भागात पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!