श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर तर्फे कोरोना प्रतिबंधक होमियोपॅथी औषधीचे मोफत वाटप
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - संपुर्ण देशामध्ये कोवीड-१९ या विषाणुजन्य संसर्गामुळे देशात भितीचे वातावरण निर्माण झालेले असून शासन यावर उपाय योजना करित आहे. त्या अनुषंगाने श्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर या ट्रस्टच्या च्या वतीने चिमूर शहरातील प्रत्येक भागात होमियोपॅथी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणजे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवीणे याकरिता औषधीचे वाटप सुरू केले आहे.चिमूर कांतीभुमीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ट्रस्ट ही नेहमी समाजसेवा, दान-धर्म, पिडीतांना सेवा पुरवीने अश्या सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असुन या कार्यासाठी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थानला आय.एस.ओ.(ISO) नामांकन सुध्दा प्राप्त झालेले आहे. तसेच एक वर्षापुर्वी कोल्हापुरमध्ये महापुर आला होता त्यावेळेस सुध्दा श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट चिमूर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाच लक्ष एकविस हजार रूपयाचा निधी सुध्दा देवस्थानने दिला आहे. आजची परिस्थीतीत पाहता संपुर्ण जगासह भारत
देशसुध्दा या कोरोना महामारिच्या भयानक संकटात सापडला असतांना या संकटावर मात
करण्यासाठी देवस्थानचा काही हातभार लागावा या उदेशाने श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट चिमूर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाच लक्ष एकविस हजार रूपयाचा निधी सुध्दा देवस्थानने जमा केलेला असुन संपुर्ण देशात झालेल्या लॉकडाउनमध्ये पायी चालत जाणाऱ्या मजुरांना सुध्दा चहा, नास्त्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केली आहे. आजची परिस्थीती पाहता चंद्रपुर
जिल्हयात होत असलेली कोरोना रूग्णांची वाढ लक्षात घेता श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट
चिमूर तर्फे आयुष मंत्रालयाचे निर्देशानुसार कोरोना रोग निवारक होमियोपॅथी औषधीचे वाटप
शहरातील प्रत्येक वार्डामध्ये डॉ. अनिलजी भार्गव, गुणवंत चटपकार यांच्या नेतृत्वात
तसेच श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट चिमूर चे अध्यक्ष डॉ. मंगेश भलमे, चंद्रकांत भोपे,
बबन बोथले, निलम राचलवार, डॉ. दिपक यावले, सुरेशपाटील डाहुले यांच्या मार्गदर्शनात हि मोहिम सुरू करण्यात आली आहे. यास देवस्थानचे कर्मचारी पुरूषोत्तम टोंगे, प्रकाश सातपुते, वैभव पेंडके, स्वरूप तळवेकर, ओमप्रकाश कुंभारे, प्रभाकर पोहिनकर, संजय राजुरकर, आकाश पचारे आदी सहकार्य करित आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!